Press Note 24-4-2025
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिये बाबत बैठक संपन्न
केंद्रीय सहकार निवडणूक प्राधिकरण,नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार हातकणंगले तालुक्यातील गंगानगर, इचलकरंजी येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधी करता विविध गटातील 17 जागांसाठी संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम प्राप्त झालेला आहे. त्या अनुषंगाने करावयाचे कार्यवाही बाबत कारखाना कार्यस्थळावर श्री अमोल येडगे,निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
बेल्हेकर,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हातकणंगले,श्री नंदकुमार भोरे प्रभारी कार्यकारी संचालक उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान करावयाचे कार्यवाही बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे निर्देशानुसार सदर निवडणुकीचा कार्यक्रम तसेच टप्पा निहाय होणाऱ्या कार्यवाही बाबत सर्व माहिती कारखान्याचे वेबसाईटवर प्रसिद्ध करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.
तसेच कारखान्याचे निवडणुक प्रक्रिये बाबत या निवडणुकी करिता इच्छुक उमेदवार तसेच सभासद यांना सविस्तर माहिती देणे करिता दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे बैठक घेण्यात येणार आहे. तरी इच्छुक उमेदवार व कारखाना सभासद यांनी सदर बैठकीस उपस्थित राहणे बाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी आवाहन केले आहे.
